बहुजन हिताय, सुखाय बहुजन, या ब्रिदवाक्यास अनुसरून 7 जून 1936 साली स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी इंग्रजी राजवाटीत कणखर, निर्धिस्तपणे आपला आवाज उठविण्यासाठी तसेच सर्वसामान्यामध्ये जनजागृतीसाठी कृषीवल या वृत्तपत्राचे लोकार्पण करीत अन्यायाविरोधातील शस्त्र हाती घेतले.
कृषीवलच्या माध्यमातून स्वर्गीय नारायण नागू पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी आपल्या लेखणीतून शेतकरी आणि कामगारांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहाचवला. कृषीवल घराघरात पोहचले.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
कृषीवलच्या माध्यमातून स्वर्गीय नारायण नागू पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी आपल्या लेखणीतून शेतकरी आणि कामगारांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहाचवला. कृषीवल घराघरात पोहचले.
गेली 27 वर्षे अखंडितपणे मोठ्या उत्साहात साजरा होणारा कृषीवल हळदीकुंकू समारंभ आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. 27 वर्षापूर्वी लावलेले हे चिमुकले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. अलिबाग शहरातून सुरु केलेला समारंभ आज रायगड जिल्ह्यातील घराघरांत पोहोचला तर महाराष्ट्रातील महिलांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे. स्व. नारायण नागू पाटील यांनी कायमच महिलांचा सन्मान केला. म्हणूनच यांच्या पुण्यातिथीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
महिलांना रोजच्या धक्काबुक्कीच्या जीवनातून थोडा निवांत वेळ मिळावा, कायमच घरात अडकणार्या महिलांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, गप्पांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधता यावा, अनुभवांची देवाण-घेवाण करता यावी, आणि प्रत्येक महिलेला नवी उमेद मिळावी, अशा अत्यंत साध्या विचाराने पण दुरदृष्टिकोन ठेऊन कृषीवल हळदीकुंकू या कार्यक्रमास 1995 साली सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कृषीवल कार्यालयासमोरील जागेतच हा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी 1 ते 2 हजार महिलांनी उपस्थिती लावली होती. मात्र 1996 मध्ये महिलांचा उत्साह पाहता 4 ते 5 हजार महिला येतील असा अंदाज बांधला अन् तयारी केली. विशेष म्हणजे तो अंदाज खरा ठरला. महिलांचा उत्साह पाहता त्यानंतर शेतकरी भवन येथे कार्यक्रम करण्याचे ठरले. त्याठिकाणी 5 ते 6 हजार महिला वाण लुटायला हजेरी लावत. महिलांचा ओघ पाहता कालांतराने पीएनपी कॉलेज मुख्यालय, जोगळेकर नाका, रायगड बाजार, पीएनपी नाट्यगृह आदी ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षी पीएनपी नाट्यगृहाच्या मैदानात हा सोहळा पार पडला. काळानूरुप या सोहळ्यात अनेक बदल झाले. महिलांच्या मनोरंजनासाठी कलाकारही आवर्जून उपस्थित राहू लागले. 1 ते 2 हजार महिलांच्या उपस्थितीने सुरु केलेला हा सोहळा 25 हजार महिलांच्या उपस्थितीपर्यंत पोहोचला आहे. सासू-सुन एकत्र या कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची धूरा चित्रलेखा पाटील यांनी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राची परंपरा जपणारा हा महाराष्ट्रातील नंबर 1 हळदीकुंकू सोहळा म्हणून नावारुपास येत आहे, याचा अभिमान वाटतो.
सुप्रिया पाटील,
माजी व्यवस्थापकीय संचालक, कृषीवल
प्रशस्तिपत्र
इतिहास
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
तारकांच्या आगमनाने महिलांचे मन अगदी भारावून जाते, या हळदीकुंकवात फक्त गर्दीच नव्हे तर माणूसकीही प्रकर्षाने दिसून येते.
कलाकरांची उपस्थिती अन् हळदीकुंकवाचा जल्लोष आहे, दिवस मानाचा-सौभाग्याचा, सर्वांसाठीच खास आहे!
फक्त माणूसपणा लक्षात घेत वाटचाल ही सुरू आहे, संकटं जरी वाटेत आली, तरी माणुसकीचा लढा कायम सुरू आहे… भव्यदिव्य अशा या सोहळ्याला माणूसपणाचा साज आहे, म्हणूनच तर साधेपणा हाच या सोहळ्याचा खरा ताज आहे!
हळदीकुंकवाची गर्दी पाहून मनही अगदी भांबावून जाते, सोहळ्याचे यश, पडद्यामागच्या कामांचे किस्से सांगत राहते.
उत्सवाला हजेरी लावून स्त्रीशक्तीला हाक दिली, आवाजाच्या कणखरतेतून माणूसपणाला साद दिली…
आ. जयंत पाटील यांनी प्राधान्याने उपस्थिती लावली, यालाच खरा नेता म्हणतात, ही बाब कार्यातून दिसून आली!
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
काम करणार्या हातांना परमेश्वर हसरी दाद देतो.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
दिवस असा हा मानाचा अन् सार्यांच्याच सौभाग्याचा, ओळख क्षणार्धाची, पण ॠणानुबंध आयुष्याचा!
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
सुरूवात केली होती शून्यातून, पण नाळ अचानक जुळत गेली.
हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात घेऊनी सौभाग्याचं लेणं, माणुसकीच्या समाजकारणात लेवूनी माणुसकीचं देणं.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
सण-समारंभातून आपल्या संस्कृतीचे जनत करावे, महिलांना एकत्र येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे, या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करुन महिलांनी महिलांच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करण्याच्या हेतून कृषीवल हळदीकुंकू सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
सण-समारंभातून आपल्या संस्कृतीचे जनत करावे, महिलांना एकत्र येण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे, या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करुन महिलांनी महिलांच्या उन्नत्तीसाठी प्रयत्न करण्याच्या हेतून कृषीवल हळदीकुंकू सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
महिला कोणत्याही धर्माची असो, त्यांना माणूस म्हणून वागवलं गेलं पाहिजे, जसा मान लग्नाच्या आधी मिळतो, तसाच मान पतीच्या निधनानंतरही मिळाला पाहिजे. तरच आपला समाज खर्या अर्थाने पुढारेल, ही भावना कायमच कृषीवलने जोपासली.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
सौभाग्याचं लेणं लाभलेल्या स्त्रीला जेव्हा अचानक वैधव्य येतं, तेव्हा तिची अवहेलना सुरू होते. आतापर्यंत तरी हेच चित्र दिसत होतं. मात्र, या चालीरिती बदलून कृषीवलने विधवा महिलांना हळदीकुंकवाचा मान दिला. महिलांना सन्मानानेच वागवावे यासाठी कृषीवलने पुढाकार घेऊन विधवा महिलांनाही हळदीकुंकू सोहळ्यात मान-सन्मान दिला. यावर्षी माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या हस्ते त्यांना वाण देण्यात आले.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
पूर्वी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. मात्र कृषीवल हळदीकुंकवाच्या निमित्ताने चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना बाहेर पडता येऊ लागले. आता परिस्थिती बदलली असली तरी, हळदीकुंकवाच्या प्रथेला मात्र अजूनही तितकेच महत्त्व आहे. कृषीवलनेही ही परंपरा गेली 27 वर्षे अखंडितपणे जपली आहे.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
कोणताही भेदभाव न करता स्वाभिमानानं वाण लुटता येणारं ठिकाण म्हणजे कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा. या सोहळ्यात वाण स्वीकारून स्त्रीत्वाचा खरा दागिना मिळवताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून कृषीवल परिवारही आनंदी होतो. हा हृदय सन्मान सोहळा महिला दरवर्षी अभिमानानं अनुभवतात.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
या हळदीकुंकू समारंभात केवळ हिंदू धर्मीय महिलाच नव्हे, तर मुस्लिम, शीख, पारसी महिलादेखील मोठ्या उत्साहात सहभागी होतात. त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यात सामाजिक ऐक्य पहायला मिळते. तसेच या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही नियम व अटी नसल्यामुळे त्या आनंदाने सहभागी होतात.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
हळदीकुंकू म्हणजे सौभाग्यवतीने केवळ वाण लुटण्याचा कार्यक्रम नाही, तर त्यातून स्त्रियांतील समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न कृषीवलने केला. कारण महिलांचा सन्मान हाच कृषीवलचा अभिमान.
महिलांच्या भरगच्च उपस्थितीमुळे शेकाप कार्यालयही अपुरे पडले. त्यामुळे हजारोंच्या गर्दीलाही योग्य नियोजन करुन वाण देण्याचे काम सुप्रिया पाटील यांच्यासह भावना पाटील, शैला पाटील, चित्रा पाटील, स्व. नमिता नाईक आदींनी केले.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
महिलांचा उत्साह तसेच वाढती उपस्थिती लक्षात घेता 1996 मध्ये हा सोहळा शेकाप कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कृषीवल हळदीकुंकू सोहळा म्हणजे आनंदाची खाण. त्यामुळे शहरासोबतच जवळपासच्या महिलाही या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत. या सोहळ्यात महिलांना वाण देताना सुप्रिया पाटील व अन्य.
कृषीवल हळदीकुंकू समारंभ
रोजच्या धकाधुकीच्या जीवनातून महिलांना थोडा क्षण मिळावा, एकमेकींसोबत संवाद घडावा, एकमेकींच्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘कृषीवल’ने हळदीकुंकू सोहळ्यास सुरुवात केली आणि खर्या अर्थाने नव्या युगाचा, नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच्या या सोहळ्यात जवळपास एक हजार महिलांनी उपस्थिती दर्शविली. सुप्रिया पाटील यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यास आज 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही हा सोहळा त्याच उत्साहात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून या सोहळ्याचे कौतुक होत आहे.