logo
logo

बहुजन हिताय, सुखाय बहुजन, या ब्रिदवाक्यास अनुसरून 7 जून 1936 साली स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी इंग्रजी राजवाटीत कणखर, निर्धिस्तपणे आपला आवाज उठविण्यासाठी तसेच सर्वसामान्यामध्ये जनजागृतीसाठी कृषीवल या वृत्तपत्राचे लोकार्पण करीत अन्यायाविरोधातील शस्त्र हाती घेतले.
कृषीवलच्या माध्यमातून स्वर्गीय नारायण नागू पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी आपल्या लेखणीतून शेतकरी आणि कामगारांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहाचवला. कृषीवल घराघरात पोहचले.

2022

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

कृषीवल या वृत्तपत्राचे लोकार्पण करीत अन्यायाविरोधातील शस्त्र हाती घेतले.
कृषीवलच्या माध्यमातून स्वर्गीय नारायण नागू पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी आपल्या लेखणीतून शेतकरी आणि कामगारांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहाचवला. कृषीवल घराघरात पोहचले.

गेली 27 वर्षे अखंडितपणे मोठ्या उत्साहात साजरा होणारा कृषीवल हळदीकुंकू समारंभ आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. 27 वर्षापूर्वी लावलेले हे चिमुकले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. अलिबाग शहरातून सुरु केलेला समारंभ आज रायगड जिल्ह्यातील घराघरांत पोहोचला तर महाराष्ट्रातील महिलांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे. स्व. नारायण नागू पाटील यांनी कायमच महिलांचा सन्मान केला. म्हणूनच यांच्या पुण्यातिथीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
महिलांना रोजच्या धक्काबुक्कीच्या जीवनातून थोडा निवांत वेळ मिळावा, कायमच घरात अडकणार्‍या महिलांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे,  गप्पांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधता यावा, अनुभवांची देवाण-घेवाण करता यावी, आणि प्रत्येक महिलेला नवी उमेद मिळावी, अशा अत्यंत साध्या विचाराने पण दुरदृष्टिकोन ठेऊन कृषीवल हळदीकुंकू या कार्यक्रमास 1995 साली सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कृषीवल कार्यालयासमोरील जागेतच हा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी 1 ते 2 हजार महिलांनी उपस्थिती लावली होती. मात्र 1996 मध्ये महिलांचा उत्साह पाहता 4 ते 5 हजार महिला येतील असा अंदाज बांधला अन् तयारी केली. विशेष म्हणजे तो अंदाज खरा ठरला.  महिलांचा उत्साह पाहता त्यानंतर शेतकरी भवन येथे कार्यक्रम करण्याचे ठरले. त्याठिकाणी 5 ते 6 हजार महिला वाण लुटायला हजेरी लावत. महिलांचा ओघ पाहता कालांतराने पीएनपी कॉलेज मुख्यालय, जोगळेकर नाका, रायगड बाजार, पीएनपी नाट्यगृह आदी ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षी पीएनपी नाट्यगृहाच्या मैदानात हा सोहळा पार पडला. काळानूरुप या सोहळ्यात अनेक बदल झाले. महिलांच्या मनोरंजनासाठी कलाकारही आवर्जून उपस्थित राहू लागले. 1 ते 2 हजार महिलांच्या उपस्थितीने सुरु केलेला हा सोहळा 25 हजार महिलांच्या उपस्थितीपर्यंत पोहोचला आहे.  सासू-सुन एकत्र या कार्यक्रमात उपस्थित राहत आहेत. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची धूरा चित्रलेखा पाटील यांनी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राची परंपरा जपणारा हा महाराष्ट्रातील नंबर 1 हळदीकुंकू सोहळा म्हणून नावारुपास येत आहे, याचा अभिमान वाटतो.

सुप्रिया पाटील,
माजी व्यवस्थापकीय संचालक, कृषीवल

jewellery-sign
कृषीवल हळदीकुंकू समारंभ

प्रशस्तिपत्र

कृषीवल हळदीकुंकू समारंभ

छायाचित्रे