Events

२०२० – हळदीकुंकू

अशोक देसाई- जीव झाला येडा पिसा (मालिका)
‘कृषीवल’ आयोजित हळदीकुंकू सोहळ्यामुळे अलिबागमध्ये येण्याची संधी मिळाली. महिलांचा कार्यक्रम म्हणून हळदीकुंकू सोहळ्याकडे पाहिले जाते. त्यामुळे या समारंभात येताना थोडा तणाव होता. एकटं-एकटं वाटत होतं. मात्र महिलांचा उत्साह, आयोजकांचे नियोजन, जनतेकडून मिळणारे प्रेम पाहून थक्क झालो.

अंकिता पनवेलकर
कृषीवल हळदीकुंकू सोहळ्यात सतत दोन वर्षे येण्याची संधी मिळाली. त्यामुळे या महिलांकडून मिळणारे प्रेम पुन्हा अनुभवता आले. या सोहळ्यामुळे अलिबागसोबत तसेच कृषीवलसोबत एक अनोखे नाते निर्माण झाले आहे.

सानिका बनारसवाले-जोशी
हळदीकुंकू सोहळ्यात हजारोंच्या संख्येने महिलांचं येणं पहिल्यांदाच अनुभवले. त्यांचा उत्साह पाहून नवी उभारी मिळाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती असतानाही कोणताही गोंधळ झाला नाही. त्यामुळे ‘कृषीवल’ने केलेल्या नियोजनाचेही कौतुक करावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *