सानिका बनारसवाले-जोशी
हळदीकुंकू सोहळ्यात हजारोंच्या संख्येने महिलांचं येणं पहिल्यांदाच अनुभवले. त्यांचा उत्साह पाहून नवी उभारी मिळाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती असतानाही कोणताही गोंधळ झाला नाही. त्यामुळे ‘कृषीवल’ने केलेल्या नियोजनाचेही कौतुक करावेसे वाटते.
उमा ॠषीकेश
मराठा साम्राज्यात ज्यांचे नाव उच्चस्थानी आहे, अशा सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग शहर वसवलं. अशा ऐतिहासिक आणि निसर्गसौदर्याने नटलेल्या नगरीत येण्याचे भाग्य मला कृषीवलमुळे लाभले. याठिकाणी आल्यानंतर महिलांनी दिलेली प्रेमाची शिदोरी कायमच जवळ ठेवू.
प्राजक्ता माळी
हळदीकुंकू सोहळ्यात महिलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून खूप छान वाटले. सोनी मराठी तसेच ‘कृषीवल’मुळे आम्हाला हा भव्य सोहळा अनुभवता आला. इतक्या मोठ्या संख्येने महिलांना हळदीकुंकवाचे वाण लुटताना पहिल्यांदाच पाहिले. गाठभेट वाढली कि, जिव्हाळा वाढतो, हे खरं आहे. अलिबागमधील महिलांना भेटल्यानंतर अलिबागबद्दल जिव्हाळा निर्माण झाला आहे.
नम्रता संभेराव
‘कृषीवल’ हळदीकुंकू सोहळा मनाला नवी उमेद देणारा होता. महिलांचा उत्साह पाहून थकवा नाहीसा झाला. महिलांना एकाच व्यासपीठावर आनंदाने, खेळीमेळीच्या वातावरणात पाहून खूप छान वाटले. भविष्यात हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी पर्वणी ठरेल, यात तीळमात्र शंका नाही.