Events

२०१८ – हळदीकुंकू

एनर्जी देणारा सोहळाः भाग्यश्री लिमये
अलिबागमध्ये ‘कृषीवल’ने आयोजित केलेला हा भव्यदिव्य सोहळा एनर्जी देणारा आहे. महिलांना एकत्र आणण्यासाठी ‘कृषीवल’ने त्यांना दिलेले व्यासपीठ उल्लेखनीय आहे. अलिबागमध्ये या समारंभामुळे येण्याचा योग आला. येथील निसर्गसौंदर्य आणि महिलांच्या आपुलकीपणामुळे अलिबागशी घट्ट नाते असल्याचा भास झाला.

थक्क करणारे व्यासपीठः वीणा जगताप
आयुष्यात कधीच प्लॅनिंगने काम केले नाही. नियोजनाशिवाय केलेले काम नक्कीच यशस्वी होते, असा माझा अनुभव आहे. शाळेपासूनच कला सादर करण्याची आवड होती. टीसीएसमध्ये नोकरी करीत असताना आवडही जपली होती. ‘कृषीवल’ ने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे पुन्हा अलिबागमध्ये येण्याची संधी मिळाली. इतक्या भव्यदिव्य स्वरूपात महिलांना दिलेले व्यासपीठ मन थक्क करणारे आहे.

एकत्र आणणारा सोहळाः तितीक्षा तावडे
सुरूवातीला हळदीकुंकू समारंभात इतक्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहतील याबाबत शंका होती, मात्र कार्यक्रमात आल्यानंतर महिलांचा ओघ पाहता, त्यांच्याकडून मिळणारा सन्मान थक्क करणारा होता. कलाकार हा कोणत्याही भागातील असला तरी कलाकार म्हणूनच ओळखला जातो. अलिबागमध्ये कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृह उभारले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरातील नाट्यगृह उभारून अलिबागची कलाकारांवरील प्रेमाची जाणीव होते. आजकाल स्त्रियांना एकत्र येण्यासाठी पार्टीचे कारण लागते. मात्र, पारंपरिक पद्धतीने महिलांना एकत्र आणला जाणारा हा सोहळा नेत्रदीपक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *